कडेगाव तालुक्यातील रायगावमध्ये सरस्वती स्कूलचा अक्षर संस्कार सोहळा उत्साहात संपन्न

कडेगाव /रायगाव न्युज:- 
सरस्वती स्कूल संचलीत रायगाव येथे अक्षर संस्कार सोहळा तसेच नवीन शाळेच्या शुभारंभानिमित्त सत्यनारायण पूजा विधीपूर्वक पार पडली. या कार्यक्रमाला पालक व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली असून संपूर्ण सोहळा आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या प्रसंगी संस्थेच्या सचिव सौ. वृषाली देशमुख मॅडम, सौ. ऋणालीराजे देशमुख मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सूर्यवंशी मॅडम तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासाची प्रेरणादायी सुरुवात करून देण्यात आली.
अक्षर संस्कार सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाची पायाभरणी करण्यात आली असून नवीन शाळेच्या शुभारंभामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा