कडेगाव तालुक्यातील चिंचणीयेथील श्री शिवाजी हायस्कूलचे एनएमएमएस परीक्षेत यश


सांगली/कडेगाव न्युज:

            गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडल चे कडेगांव तालुक्यातील चिंचणी (अं.) श्री शिवाजी हायस्कूलचे या ग्रामीण भागातील विद्यालयाने एनएमएमएस परीक्षेत यश संपादन केले आहे.
              विद्यालयातील तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट झाले.आदित्य ज्ञानेश्वर पाटील १३५ गुण ओबीसी संवर्गातून जिल्ह्यात २४वा ,कु प्रियांका निलेश महाडीक १३४ गुण ओबीसी संवर्गातून जिल्ह्यात ३१ वा 
 कु श्रेया राजेश भाट ९१ गुण एस टी संवर्गातून जिल्ह्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला.निकाल ८५%मिळणारी शिष्यवृत्ती ९ वी ते १२वी पर्यंत प्रत्येक वर्षी ४८,०००रू  योगदान प्राप्त होणार आहे.
               या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विषय  
 गणित शिक्षका सौ. आगरे पी. आर ,बुद्धिमत्ता शिक्षीका सौ. माने एम. एस.,सौ. कदम एस. के., इतिहास विषय शिक्षक पालवी एल.डी., भूगोल शिक्षक कुंभार आर. एस. तसेच विज्ञान शिक्षक दीक्षित डी. एस.यांचे मोलाच सहकार्य लाभले.
या यशाबद्दल गांधी एजुकेशन सोसायटीच्या अध्यक्ष मा. आमदार अरुण अण्णा लाड, सचिव मा. ॲड.प्रकाश भाऊ लाड, समन्वय समितीचे सचिव मा. किरण तात्या लाड, क्रांतीकारखान्याचे चेअरमन मा.शरद भाऊ लाड, गांधी एजुकेशन सोसायटीचे खजिनदार गोविंद (नाना) डुबल यांनी अभिनंदन केले तसेच मुख्याध्यापक अरुण सावत, पर्यवेक्षक सतीश मेटकरी, विभागप्रमुख दत्तात्रय दीक्षित तसेच पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

         ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या या शाळेने अनेक परीक्षांमध्ये, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. पंचक्रोशीमध्ये व तालुक्यामध्ये नावलौकिक असणाऱ्या या शाळेचे व विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परीक्षेतील यशाने सर्वत्र कौतुक होत आहे.





Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा