सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनचा ऐतिहासिक महामेळावा..!• दहा हजार पदाधिकारी आणि महिलांची विक्रमी उपस्थिती.

सांगली न्युज:-
सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचा सांगली जिल्हा उदघाटन आणि पदाधिकारी महामेळावा आजपर्यंतच्या सामाजिक राजकीय मेळाव्यांचे विक्रम मोडणारा ठरला. 
तासगाव येथील तहसील कार्यालयासमोरील भव्य मैदानावरील हा सोहळा भव्य - दिव्य, नयनरम्य तर होताच परंतु सुमारे दहा हजार पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. 
संस्थापक अध्यक्ष मेजर मनोजकुमार डांगे यांच्या स्वागताला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दहा जेसीबी मधून पुष्पवर्षाव करण्यात आला.
सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशन महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबाना आधार देण्यासाठी कार्यरत आहे असे श्री डांगे म्हणाले. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात संघटन पोहचले असून महिलांना स्वयं रोजगार देऊन त्यांच्या कुटुंबाला आत्मनिर्भर बनवण्याचे ध्येय आहे असे प्रतिपादन संस्थापक मनोजकुमार डांगे यांनी केले.
या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातील कडेगांव तासगांव, खानापूर आटपाडी जत, कवठे महांकाळ वाळवा शिराळा मिरज सांगली पलूस तालुक्यातील तालुकाध्यक्षाना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच फाउंडेशन कडून पंचवीस सभासद लाभार्थी यांना सुकन्या समृद्धी योजनेचे आणि अंतिम सन्मान योजनेचे प्रत्येकी पाच हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.
या महामेळाव्याचे आयोजन जिल्हाध्यक्ष जयंत मैदानकर आणि महिला जिल्हाध्यक्ष सौ. मनीषाताई वाघमोडे यांनी केले होते.
या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष निलेश निकम, सचिव संजय सतई, समाजसेविका सुवर्णा डांगे मॅडम, आरोग्य महासंचालक चंद्रकांत पाटील, स्वच्छ भारत अभियान संचालक दीपक दांदळे, सुरक्षा महासंचालक,सचिन साबळे (सेना मेडल) ड्रोन सेवा संचालक अरविंद पोटे उपस्थित होते.
विशेष उपस्थितीमध्ये अमरावती विभागीय अध्यक्ष ओमप्रकाश फड आणि वर्षा बगाडे,नागपूर विभाग संजय कुथे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश पाटील, स्वाती बोराटे, प्रतिभा पाटील प्रीती खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
या अभूतपूर्व कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रास्ताविक सांगली जिल्हा मीडिया प्रमुख नारायण वाघमोडे यांनी केले.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा