नसरापूर घटनेच्या निषेधार्थ कडेगांव मध्ये शिवप्रतिष्ठानचा मोर्चा तहसील कार्यालयावर जन आक्रोश.. : अशा नराधमांचा एन्काऊंटर करा ! धारकऱ्यांची एकमुखी मागणी.


सांगली /कडेगाव न्युज: 
  पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे संपूर्ण राज्य हादरले असून, या घटनेचे तीव्र पडसाद आज कडेगावमधे उमटले.  अशा नराधमाला  मृत्युदंडच झाला पाहिजे या एकमुखी मागणीसाठी कडेगाव तालुक्यातील सर्व श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी एकत्र येत तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात ज्याप्रमाणे अशा गुन्ह्यासाठी कडक शिक्षा होती त्याप्रमाणे माता भगिनीवर अत्याचार करणारांचा भर चौकात चौरंगा करण्यात यावा. अशा विकृत प्रवृत्तीच्या नराधमांना जिवंत ठेवण्याचा अधिकार नाही, तसे कडक कायदे करण्यात यावेत तरच सरकारला छ. शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचा अधिकार आहे अशा तीव्र भावना शिवप्रतिष्ठान वडियेरायबागचे कार्यवाह स्वानंद पुणेकर यांनी व्यक्त केल्या.
  छ. संभाजी महाराज चौकातून शेकडो धारकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चाने येऊन तहसीलदार यांना निवेदन दिले.
तसेच महिनाभरात या प्रकरणाचा निकाल लावावा, पीडितेला न्याय द्यावा अन्यथा गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, निषेध करणाऱ्या आंदोलकावर लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आधी राज्यातील अवैध धंदे बंद करावेत अशी ठाम मागणी नारायण वाघमोडे यांनी केली.
  धारकऱ्यांच्या घोषणांनी परिसर हादरला होता. प्रत्येक घोषणेतून नागरिकांमधील तीव्र वेदना आणि संतापाची लाट स्पष्टपणे जाणवत होती.  
या निषेध मोर्चात कडेगाव तालुक्यातील श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नसरापूर येथील घटनेने पेटलेला संताप आता संपूर्ण समाजात अस्वस्थता निर्माण करत असून, केवळ निषेध नको तर ठोस आणि कठोर कृतीची गरज असल्याचे मत  यावेळी मांडले. महिलांच्या सुरक्षेबाबत शासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चासाठी शिप्रतिष्ठानचे  जेष्ठ धारकरी दिलीप जगताप, कडेगाव विभाग प्रमुख बालाजीराव विभुते कडेगाव तालुकाध्यक्ष अमोल जाधव, शरद जगताप तसेच प्रदीप निकम, सतीश पाटील ऋषिकेश देशपांडे, संग्राम घार्गे, सतीश तवर, गोविंद रुपनर, अमोल कुलकर्णी, सचिन महाडीक, बाळासो पवार यांच्यासह शेकडो धारकरी उपस्थित होते

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा