भारती विद्यापीठाच्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रा. नंदकिशोर मोहिते यांचा ‘कृ.भा. बाबर सेवा-गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान

भारती विद्यापीठाच्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रा. नंदकिशोर मोहिते यांचा ‘कृ.भा. बाबर सेवा-गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान

सांगली/ कडेगाव न्युज:
भारती विद्यापीठाच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त कडेगाव येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय (कनिष्ठ विभाग) मधील अधिव्याख्याता प्रा. नंदकिशोर नामदेव मोहिते यांना भारती विद्यापीठाच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान आणि त्यांची गुणवत्तापूर्ण व आदर्श अध्यापकीय सेवेच्या सन्मानार्थ “कृ.भा. बाबर सेवा-गौरव पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील कात्रज-धनकवडी शैक्षणिक परिसरात पार पडलेल्या भारती विद्यापीठाच्या वर्धापनदिन सोहळ्यात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह आमदार डॉ. विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
“गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन” या ध्येयाने डॉ. पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रात देशपातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेत योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याच्या उपक्रमांतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. नंदकिशोर मोहिते यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, शैक्षणिक गुणवत्ता आणि संस्थेप्रती निष्ठा जपत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना “कृ.भा. बाबर सेवा-गौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
या सन्मानामुळे कडेगाव परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारती विद्यापीठाच्या वर्धापनदिन समारंभात प्रा. नंदकिशोर मोहिते यांना “कृ.भा. बाबर सेवा-गौरव पुरस्कार” प्रदान करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजित कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम आदी.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा