अपशिंगे सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी काँग्रेसचे श्री मेजर धनाजी सूर्यवंशी तर व्हाईस चेअरमनपदी श्री गणेश सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड *आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता*


 
*


अपशिंगे सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी काँग्रेसचे मेजर श्री धनाजी अधिकराव सूर्यवंशी यांची तर व्हाईस चेअरमनपदी श्री गणेश संभाजी सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवून भाजप पक्षाचा दारुण पराभव केला होता. या निवडीसाठी निवडनुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक अधिकारी सहकारी संस्थेचे श्री पवार होते.अपशिंगे सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदासाठी मेजर श्री धनाजी सूर्यवंशी यांना तर व्हाईस चेअरमन पदासाठी श्री गणेश संभाजी सूर्यवंशी यांना संधी देण्यात आली. दोन्ही पदासाठी एक एकच अर्ज आल्यामुळे दोन्ही निवडी बिनविरोध करण्यात आल्या. या निवडीसाठी अपशिंगेचे लोकनियुक्त सरपंच श्री भारतदादा सूर्यवंशी, उपसरपंच सौ शोभा सूर्यवंशी,मावळते चेअरमन श्री नामदेव सूर्यवंशी,ज्येष्ठ नेते धोंडीराम सूर्यवंशी,आनंदराव (बापू) सूर्यवंशी,अशोकराव साळुंखे,टी जी सूर्यवंशी सर,श्रीमंत सूर्यवंशी सर, तुकारामअप्पा सूर्यवंशी,लक्ष्मण सूर्यवंशी,नवनाथ सूर्यवंशी,नारायण सूर्यवंशी,अंकुश कुंभार,प्रशांत अपशिंगेकर,किसनमामा सूर्यवंशी, दिनकर साठे,संतोष सूर्यवंशी,संग्राम सूर्यवंशी श्रीमती तोलन पवार,श्रीमती सुनंदा भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.नूतन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे 
1) *मेजर धनाजी अधिकराव सूर्यवंशी* 
2) *कुंडलिक सीताराम सूर्यवंशी* 
3) *हणमंत गणपती सूर्यवंशी* 
4) *संजय नाथा ननवरे*
5) *दिलीप उत्तम साळुंखे*
6) *गणेश संभाजी सूर्यवंशी* 
7) *झुंझार रामचंद्र सूर्यवंशी* 
8) *हेमंत सुरेश सूर्यवंशी*
9) *श्रीमती कांताबाई भगवान सूर्यवंशी* 
10) *श्रीमती शारदा चंद्रकांत सूर्यवंशी* 
11) *हरिभाऊ रामचंद्र साखरे* 
12) *भास्कर हरी साठे* 
नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे आमदार डॉ विश्वजीत कदम, श्री शांताराम कदम,सभापती डॉ जितेश कदम, पंचायत समिती सदस्य श्री दिग्विजय कदम, सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे संचालक हर्षवर्धन कदम यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी  सभासदांना केंद्रबिंदू मानून सोसायटीचा कारभार आदर्श केला जाईल असे सांगितले. आभार विजय सूर्यवंशी यांनी मानले.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा