सागरेश्वर येथे होणार क्रांतिसिंह नाना पाटील साहित्य संमेलन.!!

सागरेश्वर येथे होणार क्रांतिसिंह नाना पाटील साहित्य संमेलन..
खानापूर कडेगांव तालुक्यातील साहित्य प्रेमी मंडळींनी दिनांक १९. मे २०२६ रोजी सागरेश्वर मंदिराचे परिसरात ११.३० ते ४ या वेळेमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या वर्षा पासून साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या वर्षी संत साहित्यांचे अभ्यासक प्रा. डी. ए. माने सर तासगाव हे या साहित्य संमेलनांचे अध्यक्ष पद भूषविणार आहेत. या वर्षीच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रसिद्ध कथाकार प्रा विश्वनाथ गायकवाड सर असणार आहेत. सकाळी ११.३० वाजता या संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार असून ॲड सुभाष पाटील हे या साहित्य संमेलनांचे उदघाटन करणार आहेत.
१२.३०पासून कविसंमेलन होणार आहे. या परिसराततील नवोदित साहित्यीक कविंनी या संमेलनात सहभागी होणेचे आवाहन साहित्यिक रघुराज मेटकरी, कवि एम. बी जमादार, कवि एकनाथ गायकवाड, प्रा विश्वनाथ गायकवाड, ॲड सुभाष पाटील यांनी केले आहे.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा