क्रांतिसिंह नाना पाटील पहिले साहित्य संमेलन महाराष्ट्रत प्रसिद्ध होणार.प्रा. डी. ए‌. माने.

सांगली /कडेगाव :-


भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी खूप मोलाचे कार्य केलं ते थोर सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाचं पहिले साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येतील प्रसिद्ध सागरेश्वर मंदिरात परिसरात हॉल मध्ये आज अतिशय उसामध्ये संपन्न झालं . सुरुवातीला सागर शह परिसरात असणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ अर्पण करून संमेलनाची सुरुवात केली.
या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष थोर विचारवंत ,प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डी. एम. माने होते .ते म्हणाले क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य आणि यशवंतराव चव्हाण यांचे कार्य या दोन्हीही महापुरुषांना मी वंदन करतो.त्यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला अभिमान आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने सुरू होणारे हे साहित्य संमेलन महाराष्ट्रभर प्रसिद्ध होईल . हे साहित्य संमेलन म्हणजे गंगोत्रीचा विस्तार निश्चितच गंगासागरा कडे होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
 यावेळी त्यांनी या साहित्य संमेलनामध्ये संत ज्ञानेश्वरापासून आजपर्यंत सर्व संतांच्या कामगिरीबद्दल साहित्य बद्दल माहिती दिली संत ज्ञानेश्वरानेच मराठी भाषा सुरुवात केली.  याची उदाहरण दिली. त्याचबरोबर साहित्य संमेलनासाठी खूप  शुभेच्छा दिल्या .क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिशांना या देशातून या देशातून हद्दपार केलं त्यांचे जनतेची सेवा केली आणि म्हणूनच  राज्यातील जनतेने बीड जिल्ह्यातून क्रांतीसेनाना प पाटलांना खासदार म्हणून लोकांनी निवडून दिल.
 त्यांच्या भाषणाचे ,कार्याच्या अनेक किस्से त्यांनी सांगितले त्याचबरोबर कांती श्री नाना पाटील यांनी 1972 च्या लढ्यात सुरू केलेले कार्य त्यांनी सांगितले त्यांच्या विचाराचे साहित्य संमेलन होत आहे याचा सर्वांना अभिमान आहे हे साहित्य संमेलन महाराष्ट्र प्रसिद्ध होईल. 
यावेळी साहित्य संमेलनाचे उद्घाटक एडवोकेट सुभाष पाटील म्हणाले कडेगाव ,खानापूर साहित्य मंडळ व सागरेश्वर उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने आज क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाचं साहित्य संमेलन सुरू होत आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचार ,कार्य तरुण पिढीला समजावे, सामाजिक प्रश्न समाजाचे समस्या लेखकांना मांडाव्यात या भूमिकेतून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या साहित्य संमेलन सुरू करण्यात येत आहे. 
साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष ग्रामीण कथाकार विश्वनाथ गायकवाड म्हणाले या साहित्य संमेलनातून नवोदित कवी ,लेखक यांना लेखन करता यावे समाजातील सामाजिक प्रश्न वेगळे समस्या यावर लेखनातून समाजाचे परिवर्तन करावे समाज सुधारण्याच्या भूमिकेतून या क्रांतिवीरांचे कार्य आणि क्रांतीवीरांचे विचार समाजापुढे यावेत आणि म्हणून साहित्य संमेलनमुळे उपस्थित असणाऱ्या सर्व प्रमुख मान्यवर आणि कवीचे लेखकांचे त्यांनी स्वागत केले. 
प्रमुख उपस्थिती जेष्ठ कवी साहित्यिक रघुनाथ मेटकरी म्हणाले यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ह्या क्रांतिकारकांच्या नावाचे साहित्य संमेलन या भूमीमध्ये होत. ही भूमी क्रांतिवीराची आहे आणि या क्रांतीवीरांनाच या साहित्य संमेलन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी सर्व साहित्यिक या ठिकाणी उपस्थित आहेत. हे संमेलन एक उत्कृष्ट संमेलन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
सागरेश्वर उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष भोसले म्हणाले ही क्रांतिसिंह नाना पाटील यांनी याच डोंगरदऱ्यातून क्रांतीला सुरुवात केली 1942 चा लढा याच सागरेश्वर मंदिरआणि सर्व या दऱ्याखोऱ्यातून बैठका घेऊन यात सागरेश्वराच्या मंदिरामध्ये क्रांतीसेनाना पाटील आणि तत्कालीन सर्व स्वातंत्र सैनिकांनी लढ्याच्या भूमिकेतून या भूमीतून सुरुवात केली अशा अनेक गोष्टी त्यांनी या वेळेला सांगितले. 
यावेळी सांगली जिल्ह्यातून प्रसिद्ध कवी उपस्थित होते कवी संमेलनमध्ये प्रामुख्याने सामाजिक समस्या ,आजचे वास्तववादी कविता,  शेतकरी, आई, वडील ,मूलभूत प्रश्न समाज परिवर्तन अशा वेगवेगळ्या आशयाच्या कविता खूप उत्कृष्ट पद्धतीने सर्व कवीने सादर केल्या .
प्रामुख्याने यामध्ये प्रसिद्ध कवी रघुनाथ मिटकरी ,विश्वनाथ गायकवाड ,एडवोकेट सुभाष पाटील ,आनंद हरी, एम.बी. जमादार ,सुनील गुरव ,अशोक पवार  एकनाथ गायकवाड, जगन्नाथ विभूते ,काकासाहेब देशमुख  रमेश गायकवाड, नामदेव जाधव ,दिपाली जाधव, सुवर्णा जगताप, तुकाराम पवार, धनाजी येलमर ,दीपक सदाकडे, उमेश पेठकर ,राम सुतार  मोहन राजमारे ,अमर पाटील ३५ कवीने साहित्यिकांनी सहभाग घेतला. 
साहित्य संमेलनाचे स्वागत विश्वनाथ गायकवाड, आभार एकनाथ गायकवाड सूत्रसंचालन एम. बी .जमादार सुनील गुरव यांनी केले.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा