कडेगाव येथील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या श्रीराम मंदिरात श्रीमद् भागवत महपुराण कथा सप्ताहाचे आयोजन: देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रा.दिपक कुलकर्णी.
कडेगाव येथील श्रीराम मंदिरात अधिक जेष्ठ शुll एकादशी मंगळवार दि 26/05/2026 पासुन श्रीमद् भागवत महापुराण कथा सप्ताह प्रारंभ होत आहे व सांगता अधिक जेष्ठ कृll प्रतिपदा पर्यंत दररोज सायंकाळी 4ते8 सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष प्रा दिपक कुलकर्णी यांनी सांगीतले.या भागवत महपुराण सप्ताह कथानिरूपणकार ह.भ.प.सौ.प्राची व्यास डोंबिवली मुंबई तर संगितसाथ हार्मोनियम श्री अशोकराव कुलकर्णी,तबला साथ श्री रामभाऊ शिंदे आहेत.या सात दिवस चालणाऱ्या भागवत महापुराण सप्ताहात मंगळवार दि 26/05/2026 रोजी सकळी 8.30 ते 10.30 या वेळेत श्रीमद् भागवत ग्रंथ दिंडी,ग्रंथ पूजा,श्रीकृष्ण पुजा,तुळशी पुजा वेदसेवक श्री शैलेश कुलकर्णी गुरूजी हे करणार आहेत.या शिवाय भागवत महात्म्य कथा सायंकाळी 4 ते 8 यावेळेत सांगण्यात येणार आहे अशी माहीती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.दिपक कुलकर्णी यांनी दिली.चहापान सेवेची जबाबदारी देवस्थान ट्रस्टचे विद्यमान सदस्य,वसंत इनामदार,रमेश शिराळकर,वैभव रणभोर,यांच्या सह माजी पोलीस निरीक्षक तानाजीराव भोसले,गोकुळ ज्वेलर्स,व देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीकांत देशपांडे करणार आहेत तर सोमवार दि 01/06/2026 रोजी दु 12.30वा.सर्व भक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.महाप्रसदाचे मानकरी श्री गंगाधर पांडुरंग ढवळीकर व सौ.क्षमा गंगाधर ढवळीकर कराड यांच्या वतीने करण्यात येणार आहे तरी कडेगाव परिसरातील सर्व भक्तांनी कडेगाव येथील श्रीराम मंदीरात चालणाऱ्या श्रीमद् भागवत महापुराण कथा सप्ताहास उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहान देवस्थान ट्रस्टच्या वतीने देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.दिपक कुलकर्णी यांनी केले.