जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे यांच्या पत्नीच्या दु:खद निधना नंतर भावपुर्ण श्रध्दांजली वाहताना पती राजाभाऊ डांगे बोलताना.....!
भावपूर्ण श्रद्धांजली
सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी कैलास निवासी शिवपार्वतीच्या चरणी विलीन झालेली माझी धर्मपत्नी सौ नंदादेवी हिच्या चरणाचा अभिषेक माझ्यालोचनाच्या कमलपुष्पातील अश्रुंनी करत आहे. तिच्या चरणाची पूजा करून माझ्यासारखा अभागी पती नतमस्तक होत आहे. 45 वर्षांपूर्वी डोईवर सुसंस्कार स्वाभिमान त्याग प्रेम जिव्हाळा माणुसकी यांचा कलश घेऊन धर्मपत्नी म्हणून लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या गरिबाच्या पर्णकुटीत तिने प्रवेश केला. त्या लक्ष्मीच्या पावलांनी व स्पर्शाने माझी गरीबाची झोपडी थरथरली कारण त्या झोपडीला माहित होते या झोपडीचा महाल बनवून त्याचे मंदिरात रूपांतर करणारी लक्ष्मी आली आहे. सासरी आल्यापासून कोणताही मोह,स्वार्थ न ठेवता झोपडीचे मंदिर बनवण्याचे स्वप्न डोळ्यापुढे ठेवून कष्ट करण्यास सुरुवात केली. येणाऱ्या प्रत्येक संकटांना झुंज देत सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू लागली तिचे हे स्वप्न सत्यात उतरवून आणि झोपडीचे महाल आणि त्या महालाचे मंदिर बनवले आणि त्या मंदिरात सर्वांना आनंदी ठेवू लागली. स्वतः देवघरातील पणतीप्रमाणे जळत राहिली आणि दुसऱ्यांना प्रकाश देणारी ती लक्ष्मी बनली. घरात नातवंडे आली आणि घर आनंदाने डोलू लागले परंतु काळाने अचानक तिला शिवचरणी समर्पित केले. दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस आले पण ते तिला बघण्याची संधी पूर्णतः मिळाली नाही.जसे ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नींनी अत्यंत साधेपणाने संसार सांभाळून शिक्षण क्षेत्राची महान कार्य करण्यास मोलाची साथ दिली त्याचप्रमाणे माझ्या धर्मपत्नीने मला माझ्या शिक्षण क्षेत्राच्या कार्यात अनमोल साथ दिली.भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी.होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार या अभागी पतीचे तुझ्या चरणी त्रिवार वंदन तुझा अभागी पती-
माननीय श्री राजाराम धोंडीराम डांगे (बीएससी) संस्थापक अध्यक्ष जय महाराष्ट्र शिक्षण संस्था कडेगाव तालुका-कडेगाव जिल्हा-सांगली.(श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालय कडेगाव)