भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय आणि उद्यानविद्या महाविद्यालयाच्या वतीने जागतिक नेत्रदिना निमित्त नेत्रचिकित्सा शिबिर आणि नेत्रदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!!
भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय आणि उद्यानविद्या महाविद्यालय कडेगाव जि. सांगली येथे बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी जागतिक नेत्रदिन निमित्त नेत्रचिकित्सा शिबिर आणि नेत्रदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय सांगली येथील नेत्रतज्ञ आणि मेडिकल टीम उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मरणोत्तर नेत्रदान संकल्प फॉर्म भरून जमा केले आणि प्रतिज्ञा घेतली. तज्ञ डॉक्टर डॉ. प्रवीण हंकारे यांनी नेत्रदानाचा उद्देश लोकांना मृत्यूनंतर त्यांचे नियंत्रण नेत्रदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि अंधत्वावर मात करून दृष्टीहीन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणे हा आहे हे विशद केले, तसेच यासाठी कोणत्याही वयाची लिंगाची किंवा रक्तगटाची व्यक्ती नेत्रदान करू शकते अगदी चष्मा असलेली मधुमेह किंवा रक्तदाब असलेले रुग्णही डोळे दान करू शकतात आणि डॉ. कौस्तुभ पाटील यांनी नेत्रदानाचे महत्त्व, तसेच नेत्रदांना विशेष सविस्तर माहिती दिली नेत्रदान कोण करू शकते त्याची प्रक्रिया कधी व कशी होते तसेच नेत्रदान कसे करावे डोळ्याचा कोणता भाग दान होतो याबद्दल सविस्तरपणे माहिती विशद केले. मेडिकल टीम मध्ये डॉ. निशा बिराजदार, डॉ. अतुल्या नायर डॉ. सिद्धी गरड, सौ. जयश्री सातपुते आदी सहभागी होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अधिकराव जाधव होते. डॉ. जाधव यांनी महाराष्ट्रातील नेत्रदान विषयी जागरूकता मोहीम साठी महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाद्वारे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून या महाविद्यालयामध्ये आज विशेष शिबिर आयोजित केले आहे यासाठी कोणते उपयुक्त दुवे आणि संदर्भ तसेच जागरूकता त्याचे महत्त्व,नेत्रदानाविषयी पात्रता आणि प्रक्रिया तसेच, प्रत्यारोपणाची प्रेरणा याबाबत उपस्थितांना अवगत केले. त्याचबरोबर भारती विद्यापीठाच्या आरोग्य विभागासही विशेष आभार मानले. या कार्यक्रमाची प्रस्तावना उप प्राचार्य डॉ. युवराज जाधव यांनी केली .प्रमुख उपस्थितीमध्ये उप-प्राचार्य डॉ. रणवीर पवार उप-प्राचार्य हे होते. कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैभव चोपडे, डॉ. गोविंद शिवरकर, डॉ. रोहित पवार यांनी केले. कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.