Posts

जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ.प्रथमेश व्यास व डॉ समृध्दी व्यास वइयत्ता पाचवीतील स्कॉलरशिप मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेली प्रांजल प्रमोद यादव यांचा संयुक्त सत्कार संपन्न

Image
माजी विद्यार्थी डॉ प्रथमेश व्यास व इयत्ता पाचवी मधील तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेली प्रांजल यादव यांचा संयुक्त सत्कार समारंभ संपन्न  कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथुन प्रथमेश हे एम बी बी एस झाले.त्यानंतर एम एस नेत्ररोग तज्ञ लातुर येथे केले .लातुर येथे एम एस मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या  डॉ.प्रथमेश व डॉ .समृध्दी व्यास या. दोन डाॅक्टरांचा सत्कार सोहळा'जयमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे यांनी श्री शिवप्रभु विद्यालयात आयोजित केला होता.   माजी विद्यार्थी डॉक्टर प्रथमेश प्रदीप व्यास व इयत्ता पाचवी स्कॉलरशिप मध्ये कडेगाव तालुक्यात पहिला क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी प्रांजल प्रमोद यादव यांचा संयुक्त सत्कार करण्यात आला.   डॉ.प्रथमेश हा श्री शिवप्रभु विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे वैद्यकीय क्षेत्रात एम एस पदवी परिक्षेत उज्वल यश संपादन केले असल्यामुळे या दोन्ही डॉक्टरांचा  सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे, डॉ प्रदिप व्या...

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

Image
सांगली/कडेगांव. आपण आपल्या घरातील आईवर जेवढे प्रेम करतो तेवढेच प्रेम ग्रामीण भागात आजही शेतकरी गाईवर करतो. याचे उत्तम उदाहरण सांगली जिल्ह्यातील कडेगांवात पाहायला मिळाले. या गावातील विजय रास्कर या शेतकऱ्याच्या परिवाराने आपली लाडकी गाई 'माऊलीचे' डोहाळ जेवण घालून कडेगांव तालुक्यात एक अनोखा संदेश दिला. गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात, असे संबोधले जाते. त्याला कारण देशी गाईचे दूध लहान मुलांसाठी अमृता समान असते. तर देशी गाईचे गोमूत्र, शेणाचा सुद्धा वापर औषधी समजला जातो. त्यामुळे या गाईचे महत्त्व समजलेल्या विजय रास्कर,यांच्यासह आनंदराव रास्कर बापु ,गणेश खरात यांना माऊली ही गाय त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक बनली. यामुळे गाईचे सुद्धा डोहाळ जेवण घालण्याचा निर्णय विजय रास्कर यांनी व त्यांच्या रास्कर परिवाराने घेतला. या अनोख्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी संपूर्ण रास्कर,खरात समाज जमा झाला होता. माऊली या गायीची साडी आणि हार घालून महिलांकडून ओटी भरण्यात आली. मग, गोडधोड खायला घालून तिला ओवळण्यात आले. या कार्यक्रमाला रास्कर कुटुंबातील नाते...

कडेगांव येथे महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांचे वतीने आषाढी दिंडींचे आयोजन

Image
*महात्मा गांधी विद्यालय ( टेक ) व श्रीरंग नामदेव कदम ज्यु. कॉलेज कडेगाव येथे आषाढी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न*  सांगली/कडेगाव :  कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालय (टेक) व श्रीरंग नामदेव कदम ज्यु. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक आषाढी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाला. या प्रसंगी (ज्ञानेश्वरी) पालखीचे पूजन करण्यासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व अपशिंगे गावचे लोकनियुक्त सरपंच मा. भारत सूर्यवंशी, मा. नगरसेवक नितीन शिंदे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण डी. व्ही. साहेब, उपमुख्याध्यापक श्री. रोकडे सर, पर्यवेक्षक श्री. भंडारे सर, रयत बँकेचे चेअरमन व ज्येष्ठ शिक्षक श्री. शेख बी. एच. सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषात दिंडी सोहळा काढला. श्री विठ्ठल-माऊलीच्या प्रतिमेची मिरवणूक करत संपूर्ण परिसर भक्तिमय करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक श्री. वैभव कदम सर, कलाशिक्...

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

Image
राष्ट्रीय परिषदेसाठी धनंजय देशमुख, अमोल डांगे यांची निवड. " हरियाणा येथील राष्ट्रीय परिषदेसाठी  राज्यातून ४८ जणांची निवड." " राष्ट्रीय परिषदेत धनंजय देशमुख अमोल डांगे यांचा सहभाग." सांगली/कडेगाव:       शहरी विकास, नागरी सुविधा, जलव्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान आदी विविध विषयांवर चर्चा करणेसाठी संबंधित यंत्रणांनी केलेल्या सादरीकरणाचा नगरपरिषदांच्या कार्यपद्धतीतील नवकल्पनांच्या अभ्यासासाठी भारतीय संसदेमार्फत ‘संविधानिक लोकशाही आणि राष्ट्रनिर्मिती बळकट करण्यासाठी हरियाणा येथील गुरुग्राम  येथे राष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्रातून ४८ लोक प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनगराध्यक्ष पै. अमोल डांगे यांची निवड झाल्याने कडेगावचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांनी या राष्ट्रीय परिषदेसाठी सहभाग नोंदवला असून. या परिषदेमध्ये शहरी विकास, नागरी सुविधा, जलव्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान आदी विविध विषयांवर संबंधित यंत्रणांनी सादर केलेल्या कार्यपद्धतीचा नवकल्पनांचा अभ्यास करण्याची संधी नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक...

अंमली पदार्थ विरोधी दिनाची महात्मा गांधी विद्यालयाने कडेगांव शहरातून काढली जनजागृती फेरी.

Image
*अंमली पदार्थ विरोधी दिन आणि जनजागृती फेरी महात्मा गांधी विद्यालय कडेगाव येथे उत्साहात साजरी*  सांगली/कडेगांव   महात्मा गांधी विद्यालय कडेगाव येथे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीत विद्यार्थ्यांनी "व्यसन म्हणजे गुलामगिरी", "धूम्रपान व मद्यपान आरोग्याच्या धोक्याचे कारण", अशा सामाजिक संदेश देणाऱ्या घोषणा आणि फलकांच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती केली. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण डी. व्ही. साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी विद्यार्थ्यांनी गावातील मुख्य रस्त्यावरून फेरी काढत अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याचे महत्व पटवून दिले. उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला शिक्षक  श्री. माने एस. एस सर श्री. वैभव करांडे सर आणि अन्य शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

नमो शेतकरी योजनेचा सरकारला विसर!! विधानसभा निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना हप्ता मिळालाच नाही.शेतकरी संतप्त..

नमो शेतकरी' योजनेचा सरकारला विसर विधानसभा निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना हप्ता मिळालाच नाही; शेतकरी संतप्त सांगली /कडेगांव.( हिराजी देशमुख ) शेतकरी जे मागतो, ते सरकार देत नाही आणि जे मागितले नाही ते देण्याचा प्रयत्न करते, अशा शब्दांत राज्यातील शेतकरी सध्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत. निमित्त आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या 'नमो शेतकरी योजने'चे विधानसभा निवडणुकीपूर्वी गाजावाजा करत सुरू झालेल्या या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला; मात्र निवडणुकीनंतर एकही हप्ता न मिळाल्याने सरकारला या योजनेचा विसर पडला की काय, असा संतप्त सवाल बळीराजा विचारत आहे. केंद्र सरकारच्या 'पीएम किसान योजने'च्या धर्तीवर, ज्याद्वारे शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये मिळतात, त्याच धर्तीवर राज्य शासनाने 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजना सुरू केली. यानुसार, पीएम किसान योजनेच्या सहा हजारांव्यतिरिक्त राज्य सरकारकडूनही वर्षाला सहा हजार रुपये, म्हणजेच एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांनी ही योजना मागितली नसतानाही, विधानसभा निवडणुकीत मत...

निधन वर्ता

Image
भैरवनाथ,व पुर्व भाग सर्व सेवा सोसायटी चे सचिव व माजी चेअरमन आबासाहेब देशमुख यांचे दुःखद निधन कडेगांव/प्रतिनिधी  खानापूर पश्र्चिम भाग मजूर संस्था व कडेगांव पुर्व भाग सर्व सेवा सोसायटीचे जुन्या काळातील नामवंत सचिव, भैरवनाथ सर्व सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन आबासाहेब बापूसाहेब देशमुख यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले,सुना नातवंडे भावजयी पुतणे असा मोठा परिवार आहे.रक्षाविसैजण सोमवारी सकाळी 9 वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी कराड विटा रोड येथे होणार आहे.                   निधन वार्ता  पार्वती शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन कडेगांव प्रतिनिधी  रयत शिक्षण संस्थेचे माजी सेवक गोविंदराव शिंदे (सर) यांच्या सुविद्य पत्नी व डॉ. दीपक व महेश सर यांच्या आई. पार्वती गोविंद शिंदे यांचे वयाच्या 65व्या वषै वृध्दापकाळाने निधन झाले .त्यांच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगी दिर भावजय असा परीवार आहे फोटो ओळ पार्वती शिंदे कडेगांव